माझ्या विधानांची शरद पवार, राऊत यांच्याकडून मोडतोड

Chandrakant Patil: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आरोप
Chandrakant Patil on Sharad Pawar
पालकमंत्री चंद्रकांत पाटील File Photo
Published on
Updated on

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत राजकीय आवश्यकतेपोटी माझ्या शब्दांची मोडतोड करतात, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

ते सोमवारी विविध विभागांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भाजपची स्थापना पाच हजार वर्षांपूर्वी झाली, भाजपला पाच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे, असे मी म्हटल्याचे विरोधी सदस्य सांगताहेत; पण आपण तसे कधीच बोललो नाही, असा खुलासा पाटील यांनी केला. सध्या एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आहे, त्यातून तुम्ही माझी विधाने शोधून काढू शकता, असा सल्लाही त्यांनी दिला.

1951 मध्ये आमचा जनसंघ पक्ष होता. त्यानंतर आम्ही जनता पार्टीत होतो. 1980 मध्ये भाजपची स्थापना झाली हा आमचा इतिहास आहे, अशी आठवण त्यांनी करून दिली.

चंद्रकांत पाटील म्हणतात...

  • जुना विषय संपवायचा असेल, तर नवीन विषय निर्माण करण्याची राजकीय पद्धत सुरू.

  • राज्यात दुष्काळ नाही, काही ठिकाणी केवळ पाणीटंचाई.

  • सांगली जिल्ह्यातही पाणी टंचाई. उपाययोजनांच्या सूचना

  • अमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण. कायद्याचा धाक ठेवण्याच्या सक्त सूचना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news