

ऐतवडे खुर्द : येथे मंगळवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात एक वर्षाच्या खिलार कालवडीचा मृत्यू झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले. या परिसरात बिबट्याने यापूर्वी दहा शेळ्यांवर हल्ला करून ठार मारले आहे.
सध्या ऊस हंगाम सुरू असल्याने भीती वाढली आहे. गावापासून चौगुले मळा, मुगदुमी, पर्वतवाडी, पवार वस्ती बामनकी आदी परिसरात शेतवस्तीत लोक रहिवासी झाले आहेत. त्यांना बिबट्या वारंवार दिसत आहे. सध्या शाळेपाठीमागील बाजूस असणाऱ्या मधुकर शामराव पाटील यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस गोठ्यातीलकालवडीवर हल्ला करून ठार मारले आहे. सध्या शाळेच्या आसपास बिबट्याचा वावर आहे.