Sangali news: उधळलेल्या बैलगाडीच्या धडकेत शर्यतप्रेमीचा मृत्यू, बोरगावच्या 'श्रीनाथ केसरी'ला गालबोट

१३ जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार, शर्यतींच्या उत्साहाला दुर्देवाचे ग्रहण
Sangali news
Sangali news
Published on
Updated on

मळणगाव : बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे रविवारी आयोजित श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीला दुर्दैवाचे ग्रहण लागले. आदत गटातील शर्यतीच्या दरम्यान अचानक बैल बुजल्याने तीन ते चार बैलगाड्या धावपट्टी सोडून बाहेर उधळल्या. या गोंधळात रस्त्याकडेला चहा घेत उभे असलेले बैलगाडी शर्यतप्रेमी अंबाजी शेखू चव्हाण (वय ६०, रा. बुद्देहाळ, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांना एका उधळलेल्या बैलगाडीची पाठीमागून जोरदार धडक बसली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बोरगावमध्ये सकाळपासून हजारो बैलगाडा शौकिनांचा जमाव झाला होता.

अंबाजी चव्हाण हे तानाजी करांडे यासह मित्रांच्या सोबत बुद्देहाळ येथून रविवारी सकाळी आठच्या सुमारास दुचाकीवरून बोरगाव येथे शर्यत पाहण्यासाठी आले होते. मात्र एका क्षणातच शर्यतीचा आनंद दुःखांत बदलला. शर्यतीने जोरदार रंग घेत असतानाच घडलेल्या अपघातामुळे संपूर्ण मैदानावर शोककळा पसरली.

आदत गटातील शर्यतीच्या दरम्यान अचानक बैल बुजल्याने तीन ते चार बैलगाड्या धावपट्टी सोडून बाहेर उधळल्या. यावेळी शर्यत पाहण्यासाठी उभ्या असलेल्या शौकिनांची एकच पळापळ उडाली. या गोंधळात रस्त्याकडेला चहा घेत उभे असलेल्या अंबाजी शेखू चव्हाण यांना एका उधळलेल्या बैलगाडीची पाठीमागून जोरदार धडक बसली.

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत जवळपास १३ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ येथे उपचार सुरू आहेत.

या जखमीवर उपचार सुरु

दरम्यान यावेळी जखमी झालेल्या पैकी नईम आयुब पठाण (वय २५, रा. पुलब्री, जि. छत्रपती संभाजीनगर), भारत जयसिंग गवळी (वय ३२ रा. चिंचणी ता.तासगाव), शाहीब हजरत मुजावर (वय २२ रा. जैनापूर ता.शिरुर) संतोष आनंदा चौगुले (वय ४५ रा.कोल्हापूर) सचिन कृष्णनाथ शिरगावकर (वय ४५) आणि नितीन पांडूरंग पाटील (वय ३५ दोघेही रा. कोपरडे, ता. करवीर जि.कोल्हापूर) अजित निवृत्ती वागवे (वय ४०) आणि आयुष अजित वागवे (वय १२ दोघेही रा. जाठरवाडी जि.कोल्हापूर), करण नंदू राजमाने (वय २४ रा. इचलकरंजी ता.हातकणंगले जि.कोल्हापूर) या नऊ जखमीवरती कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इतर जखमीवरती मिरज येथे उपचार सुरु आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news