Madgyal Yatra : माडग्याळ यात्रेत 10 लाख रुपयांचा वळू

लाखोंच्या घरात सौदे ः बैलांच्या किमती 80 हजार ते 2 लाख रुपयापर्यंत
Madgyal Yatra
माडग्याळ यात्रेत 10 लाख रुपयांचा वळू
Published on
Updated on

माडग्याळ : पारंपरिक यात्रेच्या निमित्ताने माडग्याळ येथे भरलेल्या खिल्लार जनावरांच्या बाजारात यंदा मोठी उलाढाल पाहायला मिळाली. जत तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पशुपालक सहभागी झाल्याने बाजाराला विशेष रंगत आली होती.

यात्रेत बैल, वळू, खोंड, गायी व कालवडी अशी विविध प्रकारची खिल्लार जनावरे मोठ्या प्रमाणात दाखल झाली होती. सनमडी, राजोबाचीवाडी, उटगी, जाडरबोबलाद, कोळगिरी, दरीबडची, वसपेठ, गुड्डापूर, सोरडी, सोन्याळ, कुणीकोनूर, कराजनगी या गावांसह सोलापूर जिल्ह्यातील पशुपालकांनीही सहभाग घेतला. यात्रेत बैलांच्या किमती 80 हजार ते 2 लाखांपर्यंत होत्या, तर खोंड 25 हजार ते 1 लाखांपर्यंत विक्रीस होते. वळूंच्या किमती साधारण 1.50 लाख ते 5 लाखांपर्यंत व्यवहार झाले.

यामध्ये माडग्याळ येथील पशुपालक शेतकरी कल्लाप्पा जत्ती यांच्या जातीवंत खिल्लार वळूने विशेष लक्ष वेधले. या वळूस तब्बल 10 लाखांची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यांनी हा वळू विकण्यास नकार दिला. सरळ नाक, देखणा बांधा आणि शुद्ध देशी वाण असल्यामुळे या वळूला मोठी मागणी असल्याचे सांगण्यात आले.

बैलांचा वापर नांगरणी, पेरणी, कोळपणी, मळणी तसेच बैलगाडीने शेतीमाल व चारा वाहतुकीसाठी केला जातो. खोंड हे शेतीतील महत्त्वाचे घटक असून नांगरणी, वखरणी, गाडी ओढणे यासाठी उपयोगी ठरतात. तसेच खिल्लार जातीचे खोंड वेगवान असल्याने शर्यतीतही त्यांना मागणी असते. वळूंचा उपयोग प्रामुख्याने उत्तम प्रतीच्या गायींच्या पैदाशीसाठी केला जातो. जातीवंत वळूंच्या मदतीने कळपाची गुणवत्ता सुधारून अधिक उत्पादक पिढी निर्माण केली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news