

मिरज : आरग (ता. मिरज) येथे लग्नात घातलेले दागिने आणि रोख रक्कम घेऊल वधूच्या कुटुंबाने पलायन केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी लक्ष्मण कृष्णा माळी यांनी पाचजणांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये आनंदा धोंडिराम भोसले (रा. आरग), मंजुळा दोडमिसे (रा. पंढरपूर), सचिन नाईक (रा. आरग), सुनीता अविनाश चौगुले (रा. एरंडोली, ता. मिरज) आणि सोनाली अमोल शिंदे (रा. सोलापूर) यांचा समावेश आहे.
वरील संशयितांच्या कुटुंबातील मुलीचा लक्ष्मण माळी यांच्या कुटुंबात विवाह झाला होता. त्यांनी लग्नामध्ये 23 हजार 770 रुपयांचे मंगळसूत्र आणि एक लाख 80 हजार रुपयांची रोकड दिली होती. लग्नानंतर पाचजण 15 दिवस त्यांच्याच घरी मुक्कामी होते. परंतु त्यानंतर मात्र लग्नासाठी दिलेली रोख रक्कम, सोने आणि नववधूला घेऊन ते पंढरपूरला निघून गेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद आहे.