

कवठेमहांकाळ : रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ ता बोरगाव टोल नाक्यावर सिएनजी वॅगनर गाडीने अचानक पेट घेतल्याने स्फोट होऊन गाडीतील चालकाचा जळुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरढोण कडून मिरज कडे जात असणारी सीएनजी वॅगनर कार (एम एच ०२ सी झेड ३५२९) या गाडीने बोरगाव टोलनाका याच्या सुमारे २०० मीटर मागे अचानक पेट घेतली, तशीच गाडी पुढे बोरगाव टोल नाक्यावर थांबली असता गाडीचे दरवाजे अचानक लॉक झाले व गाडीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला बाहेर येता आले नाही त्यात गणेश विश्वनाथ माळवदे ( वय २७) रा . कवठेमहांकाळ याचा जागीच मृत्यू झाला.गाडीने पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट झाला. या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळी वाहतूक पोलीस निरीक्षक युवराज पाटील यांनी भेट दिली.