Sangli FDA Raid : ‘ब्लिंकिट’च्या सांगलीतील गोदामावर ‘एफडीए’चा छापा

परवाना निलंबित; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
FDA Action
FDA Actionfile photo
Published on: 
Updated on: 

सांगली : किराणा मालासह ऑनलाइन साहित्याचा पुरवठा करणाऱ्या ब्लिंकिट प्रा. लि. कंपनीच्या सांगली शाखेवर अन्न व औषध प्रशासनाने शनिवारी छापा टाकून तपासणी केली. यावेळी किराणा साहित्य अस्वच्छ ठिकाणी साठवून ठेवल्याचे आढळून आल्याने तपासणी पूर्ण होईपर्यंत या शाखेचा परवाना निलंबित करण्यात आला आहे, अशी माहिती ‘अन्न व औषध’चे सहायक आयुक्त रावसाहेब समुद्रे यांनी दिली.

समुद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने येथील मार्केट यार्डमधील रेल्वे स्टेशनजवळील वांगीकर प्लॉटमध्ये असलेल्या ब्लिंकिट कंपनीच्या गोदामावर ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान अन्नधान्य व किराणा माल अस्वच्छ वातावरणात ठेवल्याचे निदर्शनास आले.

प्रशासनाने संबंधित साहित्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून, पुढील तपासणी अहवाल येईपर्यंत शाखेचा परवाना निलंबित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे समुद्रे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.