

जत शहर : येथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील महत्त्वाचे पदाधिकारी, दोन विद्यमान नगरसेवक, युवक नेते यांनी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपचे विद्यमान नगरसेवक प्रकाश माने आणि नगरसेविका जयश्री शिंदे यांनी काँग्रेसचा हात धरला. या निर्णयामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) प्रभावी युवक नेते सलीम नदाफ (टपाले) आणि दस्तगीर नदाफ (टपाले) यांनीही समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रामराव नगरातील युवानेते अनिल शिंदे, प्रमोद चव्हाण, अरबाज शेख, राजू नगारजी आणि जमीर अत्तार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आप्पाराया बिरादार, सुजय नाना शिंदे, नीलेश बामणे आदी उपस्थित होते.