Bengaluru Mumbai train: बंगळूरू-मुंबई स्लीपर वंदेभारत तीन दिवस मिरजमार्गे सोडा

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी : स्लीपर वंदेभारतचा मार्ग बदलल्याने प्रवाशांत संताप
Vande Bharat train
Vande Bharat train
Published on
Updated on

मिरज : बंगळुरू ते मुंबई स्लीपर वंदेभारत बेळगाव, मिरज, पुणे मार्गे न सोडता धर्मावरम, रायचूर, सोलापूर मार्गे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बेळगाव, मिरजकरांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निघून गेला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बंगळुरू ते मुंबई स्लीपर वंदेभारत या महाराष्ट्रातील पहिल्या स्लीपर वंदेभारतला रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली आहे. परंतु ही स्लीपर वंदेभारत सुरुवातील बेळगाव, मिरज, पुणे मार्गे धावणार होती. परंतु रेल्वेने ऐनवेळी याचा मार्ग बदलला आणि ही स्लीपर वंदेभारत आला धर्मावरण, रायचूर आणि सोलापूर मार्गे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे ही स्लीपर वंदेभारत तीन दिवस धर्मावरण, सोलापूर मार्गे आणि तीन दिवस हुबळी, बेळगाव, मिरज, पुणे मार्गे सोडावी, कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातून वंदे भारतला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हुबळी ते पुणे आणि कोल्हापूर ते पुणे या सुरू असणाऱ्या वंदेभारला पश्चिम महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मिरज ते पुणे रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणासह दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून स्लीपर वंदभारत सुरू सोडल्यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news