बेडग : एरंडोलीमध्ये कालव्यात ट्रॅक्टर पडून मुलाचा मृत्यू

बेडग : एरंडोलीमध्ये कालव्यात ट्रॅक्टर पडून मुलाचा मृत्यू

बेडग; पुढारी वृत्तसेवा : एरंडोली (ता. मिरज) येथे एरंडोली-खंडेराजुरी रस्त्यावर राहणार्‍या सिद्धार्थ महेश चौगुले (वय 12) या मुलाचा ट्रॅक्टर कालव्यात पडून त्याखाली सापडून मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिद्धार्थ हा शनिवारी (दि. 16) दिवसभर मशागत करून सायंकाळी मागून आणलेले ट्रॅक्टरचे अवजार परत देऊन घरी येत होता. यावेळी म्हैसाळच्या शाखा कालव्याजवळ त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला.

यामुळे ट्रॅक्टर कालव्यात उलटला. या अपघातात सिद्धार्थ हा ट्रॅक्टरच्या खाली सापडला. सोबत असणारे आजोबा बाजूला पडल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांनी तात्काळ उठून आरडाओरड केली.

परंतु जवळ कोणीही नसल्याने व आजूबाजूच्या शेतातून लोक येईपर्यंत सिध्दार्थचा मृत्यू झाला. त्याच्या वडीलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांना सिद्धार्थ व दोन मुली आहेत. मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने एरंडोलीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news