Molestation Case | विट्यात अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा प्रयत्न

जाब विचारणाऱ्या वडिलांना शिवीगाळ
Crime Case
Crime CaseOnline Pudhari
Published on
Updated on

विटा : पुढारी वृत्तसेवा

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जाब विचारला म्हणून वडिलांच्या अंगावर कोयता घेऊन धावून गेल्याचा प्रकार विट्यात शनिवारी दुपारी उघडकीस आला. याबाबत संबंधित मुलीने विटा पोलिस ठाण्यात परशुराम सिदराम होनमोरे (वय ३३, रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) याच्याविरुद्ध फिर्याद दिली.

संबंधित मुलगी ही आजी आणि बहिणीबरोबर पाण्याची टाकी येथे छोटा हत्ती (एम एच ४३-पी पी- ४११६) या गाडीतून त्यांच्या खोलीवर आली होती. परत येत असताना संशयित परशुराम होनमोरे हा ती गाडी चालवत होता. चालक होनमोरे याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकाराबाबत तिच्या वडिलांनी विचारणा केली असता होनमोरे याने तिच्या वडिलांना शिवीगाळ करून कोयता घेऊन अंगावर धावून जाऊन, तुम्हाला काय करायचे ते करा, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news