Sangli Crime: मिरजेत खुनातील संशयितांवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न

मिरज शासकीय रुग्णालयातील प्रकार : एक जण ताब्यात, तिघे पसार : पिस्तुल व कोयता जप्त
Sangli Crime: मिरजेत खुनातील संशयितांवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न
Published on
Updated on

मिरज : मिरजेतील निखिल कलगुटगी याच्या खून प्रकरणातील संशयित सलीम पठाण याच्यावर बुधवारी दुपारी खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मिरज शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी पोलिसांनी वंश वाली याला ताब्यात घेतले आहे. त्याचे अन्य तिघे साथीदारांनी पलायन केले. वंश वाली याच्याकडून पिस्तुल व कोयता जप्त करण्यात आला. याप्रकरणी वंश वाली व त्याचा साथीदार सौरभ पोतदार, वैभव आवळे व अन्य एकाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कलगुटगी खून प्रकरणातील संशयित सलीम पठाण, चेतन कलगुटगी, विशाल शिरोळे आणि सोहेल तांबोळी यांना तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात बुधवारी देपारी नेण्यात आले होते. त्यांच्यासोबत सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, हवालदार राजेश गवळी, प्रवीण वाघमोडे व सचिन सनदी हे पोलिस पथक होते. सलीम पठाण याची वैद्यकीय तपासणी सुरू असताना वंश वाली हा संशयित दरवाजाजवळ थांबला असल्याचे राजेश गवळी यांच्या निदर्शनास आला.

हवालदार राजेश गवळी यांनी त्याला पकडून झडती घेतली असता त्याच्याकडे परदेशी बनावटीचे पूर्ण लोडेड पिस्तुल आढळून आले. वंश वाली याच्यावर पोलिसांची झडप पडताच त्याच्या अन्य तीन साथीदारांनी त्या ठिकाणीच कोयता टाकून पलायन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news