Sangli News : आटपाडीत उद्यापासून अतिक्रमणांंवर बुलडोझर

बाजार पटांगणासह मुख्य रस्त्यांवरील बेकायदेशीर बांधकामे निशाण्यावर
encroachment demolition
encroachment demolitionPudhari
Published on
Updated on

आटपाडी ः आटपाडी नगरपंचायतीकडून 19 मे 2026 पासून अतिक्रमणे हटवण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे.बाजार पटांगण परिसर, शुक्र ओढ्यालगतचा भाग, ब्राम्हण घाटाकडे जाणारा रस्ता, अंबाबाई मंदिर मार्ग, सांगोला चौकापर्यंतच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे प्रशासनाच्या निशाण्यावर आहे.

येथील आठवडा बाजारासाठी बाहेरील तालुक्यांतील शेतकरी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने आटपाडीत येत असतात. मात्र बाजारासाठी जागा अपुरी पडत असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत आहे. नगरपंचायतीच्या मालकीच्या जागांवरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे समोर आले असून यासंदर्भात नगरपंचायतीने 20 मार्च 2026 रोजीच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर केला होता. त्यानुसार आता प्रशासन कारवाईस सज्ज झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news