Banpuri minor girl murder case: ‘त्या‌’ नराधम पित्यास तीन दिवस पोलिस कोठडी

आजोबांनी दिली फिर्याद; मुलीच्या मृत्यूने कुटुंब हादरले
Banpuri minor girl murder case
मृत ऋतुजाPudhari
Published on
Updated on

आटपाडी : तालुक्यातील बनपुरी येथे पित्यानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलींना अमानुषपणे छळत अँगलला लटकवले. यामध्ये 9 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी जखमी झाली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नराधम बापास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बनपुरी येथील यमगर वस्तीमध्ये 25 मार्चच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दादू ऊर्फ नाना हैबती यमगर याने चोरीच्या संशयावरून संतापाच्या भरात आपल्या मुली अनुजा (वय 11) व ऋतुजा ऊर्फ सानिका (9) यांचे हात-पाय दोरीने बांधले व त्यांना घरातील अँगलला लटकवून त्यांचा अमानुष छळ केला. यामध्ये

लहान मुलगी सानिका हिचा जागीच मृत्यू झाला, तर थोरली मुलगी अनुजा ही गंभीर जखमी झाली. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. दादू याच्या तावडीतून मुलींना वाचवण्यासाठी गेलेले त्याचे वडील व मुलींचे आजोबा हैबती जगू यमगर (वय 75) यांनाही दादू याने जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी हैबती यमगर यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 109(1), 351(2) आणि 351(3) अंतर्गत हत्या आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी संशयित दादू ऊर्फ नाना याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news