Sangli News : बाजार समितीत खोट्या सभेच्या नावाखाली टेंडर रद्द?

संचालक दादासाहेब हुबाले यांचा गंभीर आरोप
Atpadi Bazar Samiti
बाजार समितीत खोट्या सभेच्या नावाखाली टेंडर रद्द?
Published on
Updated on

आटपाडी : आटपाडी बाजार समितीत टेंडर प्रक्रियेत मनमानी करून खोटी मासिक सभा दाखवत सुमारे दीड कोटी रुपयांच्या कामांचे टेंडर रद्द केल्याचा आरोप संचालक दादासाहेब हुबाले यांनी केला आहे.

हुबाले यांच्या म्हणण्यानुसार, पेव्हिंग ब्लॉक, गटर, वजन काटा आणि पॅक हाऊस या कामांसाठी बाजार समितीने टेंडर काढले होते. 31 मार्च रोजी होणाऱ्या मासिक सभेत या टेंडरवर निर्णय अपेक्षित होता. मात्र, प्रत्यक्षात 2 एप्रिल रोजी सभा झाल्याचे खोटे नमूद करून विषय क्रमांक 12 अंतर्गत टेंडर रद्द केल्याचे दाखविले.

‌‘आपल्या जवळच्या व्यक्तींनाच टेंडर मिळावे यासाठी सभापती व सचिवांनी हा प्रकार रचला. अपेक्षित ठेकेदारांना काम मिळत नसल्याचे लक्षात येताच टेंडरच रद्द करण्यात आले,‌’ असा आरोप हुबाले यांनी केला आहे. यापूर्वीही दिघंची येथील पेट्रोल पंप प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, त्या प्रकरणात बाजार समितीला गैरप्रकार मान्य करावे लागले होते. ‌‘खोटी कागदपत्रे तयार करणे, बोगस मासिक सभा दाखविणे आणि टेंडर प्रक्रियेत हस्तक्षेप करणे हा गंभीर प्रकार आहे. यामुळे शासन, पणन विभाग आणि सर्व संचालकांची दिशाभूल झाली आहे,‌’ असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पणन संचालकांकडे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ‌‘शेतकऱ्यांच्या पैशावर चालणाऱ्या बाजार समितीत भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. संचालक म्हणून मी या प्रवृत्तीविरोधात लढत राहणार,‌’ असा इशाराही त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news