मिरजेत सहायक प्राध्यापकाने संपविले जीवन

इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर उचलले टोकाचे पाऊल
Sangli News
मिरजेत सहायक प्राध्यापकाने जीवन संपविले
Published on
Updated on

मिरज : मिरज शहरात सहायक प्राध्यापकाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. बाळकृष्ण अनिल शिंदे (वय 26, रा. टाकळी रस्ता, मिरज) असे मृताचे नाव आहे. त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही. त्यांचे दोनच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. शिंदे हे मिरज शहरातील महाविद्यालयात सहायक प्राध्यापक होते. गुरुवारी रात्री त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. जीवन संपविण्यापूर्वी प्रा. शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news