

आष्टा : रागाने बघितल्याच्या कारणावरुन येथील नरवीर उमाजी नाईक चौकात दोन गटांमध्ये दगड व फरशीने जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटातील तिघे जखमी झाले .याप्रकरणी आष्टा पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल आहेत. पोलिसांनी दोन्ही गटातील 16 जणांवर गुन्हा दाखल केला. घटनास्थळी राखीव दलासह बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अशोक शिवाजी मदने, त्यांचा पुतण्या सूरज विश्वास मदने, तर दुसर्या गटातील अमोल रमेश मोटकट्टे (तिघेही रा. उमाजी नाईक हौसिंग सोसायटी, आष्टा) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत अशोक मदने यांनी प्रथमेश मिनीश मंडले, मिनीश पांडुरंग मंडले, सुरेश बबन मोटकट्टे, रामचंद्र गुंडा गुजले, पोपट संभाजी मोटकट्टे, सदानंद जगन्नाथ मोटकट्टे, संदीप पांडुरंग मंडले, दादासाहेब बाळू गुजले (सर्व रा. उमाजी नाईक हौसिंग सोसायटी, आष्टा) व संदीप यलमार (रा. गोर्डे चौक, आष्टा) यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. सुरेश बबन मोटकट्टे यांनी अंकुश शिवाजी मदने, अशोक शिवाजी मदने, सूरज विश्वास मदने, अनिकेत अंकुश मदने, शुभम विश्वास मदने, बाळू रामचंद्र चव्हाण व जीवन महादेव चव्हाण (सर्व रा. उमाजी नाईक हौसिंग सोसायटी, आष्टा) यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.