Bhavai Utsav : आष्ट्यात आजपासून 'भावई'

नगरी सज्ज : यात्रेसाठी भाविक, छोटे-मोठे व्यावसायिक दाखल
Bhavai Utsav
आष्ट्यात आजपासून 'भावई'
Published on
Updated on

आष्टा : येथे ग्रामदैवत चौंडेश्वरी (अंबाबाई) देवीच्या भावई उत्सवास आज, १० जुलैपासून सुरुवात होत आहे. यात्रेसाठी भाविकांबरोबरच छोटे-मोठे व्यावसायिकदेखील दाखल होऊ लागले आहेत.

प्राचीन काळी दैत्याच्या त्रासाला कंटाळून हैराण झालेल्या नगरजनांनी श्री चौंडेश्वरी देवीला साकडे घातले. यानंतर श्री चौंडेश्वरी (अंबाबाई) देवीने वेगवेगळी रूपे घेऊन दैत्याचा शोध घेतला. शेवटी दैत्याबरोबर युद्ध करून त्याचा वध केला. हे कथानक भावईच्या खेळांमधून दाखविले जाते. कृष्ण पक्षातील दशमी तिथीपासून २७ दिवस हा खेळ चालतो. ज्या त्या तिथीला जो तो खेळ दाखविला जातो. विविध खेळांत पारंपरिक मानकऱ्यांचा समावेश आहे. खेळगडी खेळाचा सराव करीत आहेत. सध्या उत्सवाचे वातावरण आहे.

'भावई' उत्सवातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे : १० जुलै रोजी पहाटे ४ वाजता दिवा. रात्री ११ वाजता कंकण विधी. ११ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता आळूमुळू, रात्री ११ वाजता घोडी, १२ जुलै रोजी सकाळी १० वाजता पिसे, (जोगण्याचा उपवास), सायंकाळी ७ वाजता कर तोडणे, १३ जुलै रोजी पहाटे ४ वाजता जोगण्या, सायंकाळी ५ वाजता लोट व लट्ट, १४ जुलै रोजी पहाटे २ वाजता मुखवटे, दुपारी पाखरे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news