

आष्टा : आष्टा येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आष्टा पोलिसांनी साजन नारायण औघडे (रा. आष्टा, डांगे कॉलेजजवळ) या संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 नोव्हेंबररोजी सकाळी पीडित मुलीचे तिच्या आईसोबत घरगुती कारणावरून भांडण झाले होते. त्यामुळे रागाच्या भरात ती घर सोडून शहरातील एका मंदिराजवळ बसली होती. याच वेळी दुपारी संशयित साजन औघडे तिथे दुचाकी घेऊन आला. त्याने त्या मुलीला दुचाकीवर बसवून एका खोलीत नेले.
या खोलीत त्याने तिला ‘मी सांगतो तसे कर, नाहीतर माझ्या बंदुकीने तुला गोळ्या घालीन. मला तुझ्या प्रेमाबद्दल सर्व काही माहीत आहे, मी सगळ्या गावाला हे सांगून टाकेन, अशी धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित मुलगी रडत असताना, या घटनेबद्दल ‘तू जर कोणाला सांगितले, तर तुला आणि तुझ्या घरच्यांना गोळ्या घालीन’, अशी धमकी देऊन दुपारी तिला त्याच मंदिराजवळ सोडून तो निघून गेला. या प्रकरणी पीडित मुलीच्या मावशीने आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.