Ashadhi Wari: पंढरपूरच्या सायकलिस्ट महामेळाव्यात पलूसचा ठसा

१५० किलोमीटर सायकल वारीतून पर्यावरण रक्षण, स्वच्छता अन् प्रबोधनाचा संदेश
Ashadhi Wari: पंढरपूरच्या सायकलिस्ट महामेळाव्यात पलूसचा ठसा
Published on
Updated on

पलूस : अखिल महाराष्ट्र सायकल परिषदअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यावरण रक्षणाची सायकल वारी’ पंढरपूर-पर्व ५ (२०२६) मध्ये पलूस सायकलिस्ट क्लबने १५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.

या वारीच्या माध्यमातून क्लबने पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, वाचन संस्कृती आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला. पंढरपूर येथे देशभरातील १३५ हून अधिक सायकलिंग क्लबच्या ५ हजार सायकलिस्ट वारकऱ्यांच्या महामेळाव्यात पलूसच्या सायकलिस्टनी सहभाग नोंदविला.

शनिवार, दि. ११ रोजी पहाटे ५ वाजता शिवतीर्थ, पलूस येथून विठ्ठलनामाच्या जयघोषात सायकल वारीला प्रारंभ झाला. प्रस्थानापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून तसेच पलूसचे ग्रामदैवत समर्थ धोंडिराज महाराजांचे दर्शन घेण्यात आले. यानंतर सुहास पुदाले, उपनगराध्यक्ष रोहित दळवी, जगदीश पाटील, यशवंत कदम यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून सायकल वारीचा प्रारंभ करण्यात आला.

वारी दरम्यान अनेक सेवाभावी व्यक्तींनी सायकल वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. सीपीएम हॉस्पिटलचे डॉ. किरण पाटील यांनी संपूर्ण प्रवासात वैद्यकीय सेवा दिली. अवघ्या सात सायकल वारकऱ्यांपासून सुरू झालेल्या पलूस सायकलिस्ट क्लबच्या या उपक्रमाने आज ७० हून अधिक सदस्यांचा टप्पा गाठला असून, आता १०० सदस्यांच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू आहे.

पंढरपूर येथे सर्व सायकलिस्टनी शिस्तबद्ध रिंगण सोहळा आणि प्रदक्षिणा पूर्ण करून भक्ती, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम घडवून आणला. सचिन निकम, हिम्मतराव मलमे यांनी नियोजन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news