Jat Panchayat Samiti: सभापतिपदी अर्चना पाटील; उपसभापतिपदी रविकुमार बगली

जत पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या अर्चना पाटील, तर उपसभापतिपदी रविकुमार बगली यांची बिनविरोध निवड करण्यात आली
Jat Panchayat Samiti: सभापतिपदी अर्चना पाटील; उपसभापतिपदी रविकुमार बगली
Published on
Updated on

जत : जत पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या अर्चना पाटील, तर उपसभापतिपदी रविकुमार बगली यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी तहसीलदार प्रवीण धानोरकर व गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर उपस्थित होते.

जत पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. सभापती पदासाठी भाजपच्या अर्चना पाटील, तर उपसभापती पदासाठी भाजपचे रविकुमार बगली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून कोणताही अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यानंतर अर्जांची छाननी करण्यात आली.

दुपारी दोन वाजता झालेल्या विशेष सभेत सभापती व उपसभापती पदासाठी अन्य कोणतेही अर्ज न आल्याने अर्चना पाटील यांची सभापतिपदी आणि रविकुमार बगली यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांनी केली. निवडीची घोषणा होताच पंचायत समितीच्या बाहेर जमलेल्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला. निवड जाहीर झाल्यानंतर जतचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांच्याहस्ते नूतन सभापती अर्चना पाटील व उपसभापती रविकुमार बगली यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जतचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी म्हणाले की, पंचायत समितीत भाजपचे 12 सदस्य निवडून आले असून नगरपालिकेतही भाजपची सत्ता आहे. आता पंचायत समितीतही भाजपची सत्ता आल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्याच्या विकासाला अधिक गती मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news