Aniket Kothale murder case : कामटे व साथीदारांकडून कट रचून खून

ॲड. उज्वल निकम यांचा युक्तीवाद ः पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
Aniket Kothale murder case
अनिकेत कोथळे खून प्रकरण
Published on
Updated on

सांगली : बडतर्फ पोलिस उपनिरिक्षक युवराज कामटे व त्यांच्या साथीदारांनी खून, कट रचणे, पुरावा नष्ट करणे, अशा प्रकारे गुन्हा केला आहे. या गुन्ह्याबद्दल आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मंगळवारी न्यायालयासमोर केला. या खटल्याची पुढील सुनावणी 1 एप्रिल रोजी होणार आहे.

जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. पडवळ यांच्या न्यायालयामध्ये अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी सुरु आहे. ॲड. निकम म्हणाले, युवराज कामटे व त्याच्या साथीदारांनी नियोजन करुन अनिकेत कोथळे याचा खून केला आहे. या खुनाचे अमोल भंडारे, मारुती लोंढे, बुलबुले यांच्यासह अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. अमोल भंडारे यांचादेखील ते खून करणार होते. संशयितांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खुनाव्यतिरिक्त अन्य प्रकारचे गुन्हे केले आहेत. हा गुन्हाच गंभीर व भयानक आहे. या गुन्ह्याबद्दल सर्व संशयितांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, असा युक्तीवाद त्यांनी केला.

सरकार पक्षातर्फे आज त्यांचा युक्तीवाद पूर्ण झाला. बचाव पक्षातर्फे ॲड. विकास पाटील-शिरगावकर यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले, सरकार पक्षातर्फे वारंवार संगनमत-संगनमत असे सांगितले जाते. परंतु कायद्यामध्ये संगनमताचा कोणताही मापदंड दिलेला नाही. त्यामुळे संगनमत शब्द या खटल्यात पूर्णत: लागू होणार नाही.

मंगळवारी ॲड. शिरगावकर यांचा यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही. उर्वरीत युक्तिवाद ते पुढील सुनावणीस करणार आहेत. सुनावणीस सीआयडीचे तत्कालीन उपअधीक्षक व तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते. दि. 6 नोव्हेंबर 2017 रोजी रात्री अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना उपनिरिक्षक युवराज कामटे हवालदार अनिल लाड, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला यांनी अमानुष मारहाण केली. त्यातच अनिकेतचा मृत्यू झाला. हा खून दडपण्यासाठी कामटे व त्याच्या साथीदारांनी अनिकेत याचा मृतदेह आंबोली येथे नेऊन जाळला. डीएनएवरुन तो मृतदेह अनिकेत कोथळेचा होता, हे शाबीत झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news