अॅड. भगतसिंग नाईक यांचा राष्ट्रवादीला रामराम

अॅड. भगतसिंग नाईक यांचा राष्ट्रवादीला रामराम; दसरा मेळाव्यात शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
Sangli News
अॅड भगतसिंग नाईकPudhari Photo
Published on
Updated on

शिराळा : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) माजी तालुकाध्यक्ष व शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. भगतसिंग नाईक यांनी पक्ष सोडण्याच्त निर्णय घेतला आहे, एकाधिकारशाहीला कंटाळून आपण पक्षास रामराम ठोकला असून दसरा मेळाव्यात शिक्लोना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पृथ्वीसिंग नाईक उपस्थित होते.

अॅड. नाईक म्हणाले की, मी राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून तालुकाध्यक्ष होतो. घरा-घरात पक्ष पोहोचवला आहे असे असताना आम्ही पक्षातून कसे बाहेर पडू यासाठीच जास्त प्रयत्न झाले. माझ्यासह मुलांना राष्ट्रवादी पक्षात किंमत दिली गेली नाही. गत विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांचा मुलगा सक्रिय नव्हता, त्यावेळी त्यांच्याबरोबर माझा मुलगा प्रचारात अग्रभागी होता, विधानपरिषद निवडणुकीत शेकापचे माजी आमदार कर्जत पाटील यांनी येथील विद्यमान आमदारांनी मत विचारले नसल्याचे उघडपणे सांगितले होते. माझे वडील आमदार होते, मग ही आमदारकी आमच्या पराकडेही येऊ देत ना! प्रत्येक पद तुमच्याच घरात का?

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार वैर्यशील माने जे सांगतील त्या उमेदवाराचा प्रचार करणार आहे. दसन्चाला मुंबई येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. यानंतर रविवारी पेठ नाका ते शिराळा येथे भव्य रॅलीचे आयोजन केले आहे. सिराहा शहरातून मिरवणूक व श्री अंबामाता मंदिरात सभा घेणार आहे.

Sangli News
Anil Gote: माजी आमदार अनिल गोटे यांचा राष्ट्रवादीला रामराम

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news