मराठा समाजाला दिलेली जागा हडपण्याचा डाव

मराठा स्वराज संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन : आंदोलनाचा इशारा
Sangli News
सांगली : मराठा स्वराज संघटनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महादेव साळुंखे, सर्जेराव पाटील आदी.Pudhari photo
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा

शासनाने मराठा समाजासाठी येथील कत्तलखाना परिसरात दिलेली जागा काही समाजकंटक व लोकप्रतिनिधी घशात घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी ही जागा मराठा समाजातील वसतिगृहासाठी देण्यात यावी; अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा स्वराज संघटनेतर्फे देण्यात आला. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना देण्यात आले.यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव साळुंखे, अधिकराव पाटील, सर्जेराव पाटील पंडित पाटील, सुधीर चव्हाण, उमाकांत कार्वेकर, फत्तेसिंग राजेमाने आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, सांगली कत्तलखाना परिसरातील जागा मिळण्याबाबत मागणी केली होती. वसतिगृह तसेच मल्टीपर्पज हॉल, सुसज्ज वाचनालय, अभ्यासिका, विविध व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी ही जागा शासनाने प्रस्तावित केली आहे. मात्र हा प्रस्ताव मंत्रालयात सहा वर्षे धुळखात पडला आहे. 2021 मध्ये काही एजंट या जागेची परस्पर विक्री करण्याच्या उद्देशाने तयारीत असताना तेथे लावलेल्या फलकाबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे मराठा स्वराज्य संघाच्या वतीने तक्रार केली होती. त्यावर तत्कालीन अप्पर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांच्या आदेशानुसार फलक त्वरित काढून त्यावर कार्यवाही केली. संबंधित जागा काही समाजकंटक तसेच लोकप्रतिनिधी स्वत:च्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत. तसे झाल्यास मराठा समाज कायदेशीर मार्ग अवलंबेल व वेळ पडल्यास आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news