सांगली : तो गवा अद्याप सांगलीवाडीतच; नागरिकांचा दावा | पुढारी

सांगली : तो गवा अद्याप सांगलीवाडीतच; नागरिकांचा दावा

सांगली, पुढारी वृत्तसेवा

सांगलीवाडीत आलेल्या गव्याचे रविवारी काही नागरिकांना पुन्हा दर्शन झाले. दिवसभर शोधमोहिम राबविण्यात आली. परंतु तो मिळून आला नाही. गव्याने सांगलीवाडीत ठाण मांडल्याचा नागरिकांनी दावा केला असून सर्वजण भितीच्या छायेत आहेत.

सांगलीवाडी-कदमवाडी रस्त्यालगत शनिवारी रात्री गवा दिसला होता. चिंचबागेजवळ आलेला गवा शहरात घुसू नये यासाठी नागरिकांना त्याला हुसकाविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो कदमवाडी रस्त्यावरील उसाच्या शेतात गेला होता. रात्री उशिरापर्यंत वन विभाग, पोलिस आणि अग्निशमन दलाकडून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तो मिळून आला नाही.

रविवारी सकाळी पुन्हा कदमवाडी रस्त्यावर काही नागरिकांना तो गवा दिसल्याची बातमी वार्‍यासाठी पसरली. यंत्रणा पुन्हा घटनास्थळी दाखल झाली. परंतु गवा आढळून आला नाही. गवा सांगलीवाडीतच ठाण मांडून असल्याचा येथील रहिवाशांनी दावा केला आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात गव्याचा वावर वाढला आहे. सांगली शहरालगत कसबेडिग्रज, विश्रामबाग परिसरात गवा आढळून आला होता. आता सांगलीवाडीत गवा आढळून आल्याने त्याची भिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा

Back to top button