

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : खुनी हल्ला, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर 11 गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या पंक्या मुळीक टोळीतील चौघांना मंगळवारी मोका न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली.
टोळीचा म्होरक्या पंकज नंदकुमार मुळीक (वय 22), सूरज राजाराम बाबर (वय 21), अजित उर्फ राजकुमार सिद्धाप्पा दौंडमणी (वय 22, तिघे रा. इस्लामपूर), उमेश दिनकर नाईक (वय 21, रा. अहिरवाडी) अशी त्यांची नावे आहेत.
पंक्या मुळीक टोळीविरोधात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, सावकारी, अपहरण, हत्याराने दुखापत करणे, जमाव जमविणे, धमकी देणे, असे 11 गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल आहेत. या टोळीविरोधात मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
टोळीतील मुळीक, बाबर, दोडमणी, नाईक यांना मंगळवारी मोका न्यायालयासमोर हजर करण्यात आले. चौघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.