Lok sabha Election 2024 Results : काँग्रेसच्या भूमिकेनुसार माझी पुढील वाटचाल: विशाल पाटील

Lok sabha Election 2024 Results : काँग्रेसच्या भूमिकेनुसार माझी पुढील वाटचाल: विशाल पाटील
Published on
Updated on

सांगली :पुढारी वृत्तसेवा; मी महाविकास आघाडीचा उमेदवार होतो, यापुढे काँग्रेस पक्ष माझ्याबाबतीत काय निर्णय घेईल, त्या धोरणानुसार माझी पुढील वाटचाल असेल, असे मत काँग्रेसचे बंडखोर व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, जनतेने ही निवडणूक हाती घेतली होती. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे विजयाच्या जवळ गेलो आहे. मी महाविकास आघाडीचाच उमेदवार होतो, त्यामुळे माझ्या बाबतीत काँग्रेस पक्ष काय निर्णय घेईल त्याच्याशी मी बांधील असणार आहे. माझ्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी काम केले. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. अॅड प्रकाश आंबेडकर, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, जयश्री पाटील यांच्यासह अनिल बाबर यांचे कार्यकर्ते, विटा व मिरजेतील नगरसेवक यांच्यासह सर्वच पक्षाने माझ्यासाठी प्रयत्न केला आहे. त्याचे मी आभारी आहे..

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news