सांगली : खानापूर तालुक्यातील आळसंदचा तरुण चार जिल्ह्यातून तडीपार | पुढारी

सांगली : खानापूर तालुक्यातील आळसंदचा तरुण चार जिल्ह्यातून तडीपार

विटा; पुढारी वृत्तसेवा : सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यातून १ वर्षांसाठी खानापूर तालुक्यातील सुशांत ऊर्फ हरी दिनकर वायदंडे (वय २२, रा.आळसंद) या तरुणास तडीपार करण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक मेमाणे म्हणाले,विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्या व्यक्तीवर दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपीवि रुध्द तडीपारीचे प्रस्ताव पाठविणेबाबत पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी सुशांत ऊर्फ हरी वायदंडे याच्या विरोधात उपविभागीय दंडाधि कारी आणि सांगलीच्या पोलीस अधीक्षकांच्या कडे प्रस्ताव सादर केला होता.हा व्यक्ती पोलीस ठाणे हद्दीतील आळसंद आणि आसपासच्या लोकांना दमदाटी, मारहाण, मारामारीचे गुन्हे करुन दहशत माजवत आहे. शिवाय त्या भागा तील लोकांवर घातक हत्याराने हल्ले करत आहे. या प्रस्तावाची पडताळणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केल्यानंतर या व्यक्ती विरुध्द उपविभागीय दंडाधिकारी विक्रम बांदल यांनी हा तडीपाराचा आदेश दिला आहे असे सांगत ते म्हणाले, या व्यक्तीविरुध्द विटा पोलीस ठाण्यत गंभीर दुखापत, दुखापत तसेच ठार मारण्याचा प्रयत्न करणे,शिवाय महि लासंबंधी अन्य गुन्हे नोंद दाखल आहेत. सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान शांततेत पार पडावे आणि कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काही समाजविघातक लोकांविरुध्द तसेच ज्याच्याविरुध्द दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. अशा जास्तीत जास्त आरोपी विरुध्द तडीपारचे प्रस्ताव तयार करुन प्रस्ताव मंजूरीसाठी वरीष्ठांकडे पाठवित आहोत असेही मेमाणे यांनी सांगितले आहे.

Back to top button