पोलिस ठाण्यासमोर तरुणाने पेटवून घेतल | पुढारी

पोलिस ठाण्यासमोर तरुणाने पेटवून घेतल

िमरज: पुढारी वृत्तसेवा

मित्रांनी मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी आलेल्या सरफराज महंमदअली जमखंडीकर (वय 26, रा. गुरुवार पेठ, मिरज) या तरुणाने पोलिस ठाण्यातच पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतले. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी रात्री मिरज शहर पोलिस ठाण्यात घडली.

दरम्यान, पोलिस ठाण्यातच तरुणाने पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे पोलिस वर्तुळासह शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सरफराज जमखंडीकर हा शहर पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रार देण्यासाठी आला होता. “ यासीन, अबूबकर व आयूब, अशा तिघांनी मारहाण केली आहे. त्यांना आताच अटक करा”, असे म्हणून तो दंगा करीत होता.

त्यानंतर त्याच्या म्हणण्यानुसार पोलिस ठाण्यातील काही पोलिसांनी त्याच्यासोबत जाऊन खात्री करून घेतली. मात्र त्या
ठिकाणी कोणी नव्हते. त्यामुळे पोलिसांनी केवळ “तक्रार दाखल करून घेतो”, असे सांगितले. त्याचा राग आल्याने सरफराज याने आताच अटक करा, अन्यथा मी येथे असलेल्या गाड्या पेटवतो”, असे म्हणून त्याच्या पत्नीच्या हातातून पेट्रोलची बाटली घेऊन अंगावर ओतून घेतली व पेटवून घेतले. पोलिसांनी तात्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला. सरफराजहा गंभीर भाजल्याने त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी एका पोलिसाच्या हातालाही भाजले आहे

Back to top button