आटपाडीतील बलात्कार प्रकरणाची चौकशी : पडळकरांच्या लक्षवेधीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश | पुढारी

आटपाडीतील बलात्कार प्रकरणाची चौकशी : पडळकरांच्या लक्षवेधीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची तक्रार दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ आणि गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकल्या प्रकरणी पोलीस निरीक्षकासह तीन पोलिसांची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. १९) दिले.

विधानसभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी या मुलीवर झालेला अत्याचार आणि गुन्हा दाखल करून घेण्याऐवजी गुन्हा मागे घेण्यासाठी दोन लाख रुपये देऊन दबाव टाकल्याबद्दल आज (दि. १९) लक्षवेधी प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.

पडळकर यांनी लक्षवेधीत म्हणाले, ऑगस्ट २०२३ पूर्वी तालुक्यातील एका गावातील मुलीवर तिघांनी वारंवार बलात्कार झाला. याबाबत मुलीच्या कुटुंबियानी पोलीस ठाण्यात अनेक वेळ जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही असे सांगितले.  मुलीच्या पालकांनी माझी भेट घेतली. मी नातेवाईकांच्या समवेत जिल्हा पोलीस अधिक्षक आणि वरिष्ठांची भेट घेतली. मग बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. यामध्ये पीडित मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. यावर मुलीचा गर्भपात करून तिला घरी पाठवण्याऐवजी जाणीवपूर्वक बालसुधारगृहात पाठविण्यात आले. दोन महिन्यांनी ती घरी परतली.

त्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या भावाला मारहाण केली. दोन लाख रुपये देतो असे सांगत गुन्हा मागे घेण्यासाठी दबाब टाकला. त्यामुळे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे पोलीस राकेश पाटील, शैलेश कोरवी, प्रमोद रोडे यांची चौकशी करावी अशी मागणी पडळकर यांनी केली.
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस म्हणाले बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असेल तर त्याची चौकशी करून कारवार केली जाईल. तसेच तक्रार मागे घेण्यासाठी पैसे देऊन दबाव आणला जात असेल तर ही देखील गंभीर बाब आहे. याबाबतचे ब्रिफिंग माझ्याकडे नाही परंतु याची चौकशी करून पीडित मुलीला आणि कुटुंबियांना न्याय दिला जाईल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

Back to top button