जत तालुक्याच्या दुष्काळाचा कलंक पुसणार : खा. पाटील | पुढारी

जत तालुक्याच्या दुष्काळाचा कलंक पुसणार : खा. पाटील

जत; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला गती दिली आहे. उर्वरित राहिलेली कामे लवकरच पूर्णत्वास येत आहेत. दुष्काळी जत तालुक्याला प्राधान्याने पाणी दिले जात आहे. आणखी पंधरा दिवस तालुक्यातील आवर्तन सुरू राहणार आहे वंचित भागांना जेणेकरून जास्तीत जास्त पाणी देता येईल याकडे अधिक लक्ष दिले आहे. माडग्याळ भागातील परिसराला पाणी द्यावे. म्हणून अनेक दिवसापासून मागणी होती. ते स्वप्न आज पूर्ण होत आहे. याकरिता सर्वच घटकाचे योगदान लाभले आहे. जेणेकरून तालुक्यावरील दुष्काळाचा कलंक पुसला जाणार आहे. विस्तारित पाणी योजनाचे कामे गतीने सुरू करण्याचे निर्देश दिले जातील. असे प्रतिपादन खासदार संजय काका पाटील यांनी केल.

माडग्याळ (ता.जत) मायथळ कॅनलमधून माडग्याळ परिसरात जाणाऱ्या नव्याने खुदाई केलेल्या कॅनलच्या पाणी पुजनाप्रसंगी बोलत होते.
यावेळी आ. विक्रमसिह सावंत ,आ. गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे ,डॉ. रवींद्र आरळी ,भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील, चिखलगी भुयार मटाचे मटाधिपती ह भ प तुकाराम बाबा महाराज ,माजी सभापती सुरेश शिंदे, मन्सुर खतीब ,सुनील पवार ,सरदार पाटील , प्रभाकर जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, भूपेंद्र कांबळे, सरपंच अनिता माळी ,कार्यकारी अभियंता सचिन पवार , उपभियंता गणेश खरमाटे, विठ्ठल निकम, सोमना हाक्के, सहाय्यक निबंधक अमोल डफळे आदी उपस्थित होते.

आ. सावंत म्हणाले तालुक्यातील इंच ना इंच जमीन ओलिताखाली आली पाहिजे. हेच ध्येय प्रामुख्याने आहे. गेल्या चार वर्षात सातत्याने म्हैसाळ उपसा सिंचन योजना बरोबर इतर योजनेसाठी पाठपुरावा केला आहे परंतु विस्तारित योजनेचे पाणी वेळेत मिळेल याबाबत शशांकता आहे .

आ.पडळकर म्हणाले, पाणी आपल्या परिसरात आल्यानंतर जो आनंद असतो तो शब्दात न सांगता येण्यासारखा असतो. ही परिस्थिती दुष्काळी भागातील बदलली पाहिजे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्याने विस्तारित योजनेला निधी उपलब्ध करून दिला आहे .

माजी आमदार जगताप म्हणाले, जत तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी अजूनही प्रयत्न करणे गरजेचे आहे .विस्तारित योजनेला वाव देण्यासाठी अजून भरीव निधीची आवश्यकता आहे कामे गतीने सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. वेळप्रसंगी संघर्ष करण्याची ही तयारी आहे

जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे म्हणाले, माडग्याळ भागातील वंचित भागांना पाणी मिळावे म्हणून मार्च 2020 पासून सातत्याने प्रयत्न चालू होते याबाबत तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील एक बैठक घेतली होती दरम्यान याबाबत आराखडा व नकाशा देखील तयार झाले परंतु केवळ राजकीय अनास्थामुळे काही शुक्राचार्यामुळे काम थांबविण्यात आले होते . काम सुरू झाले आणि वन विभागाने काम बंद पडल्याने शेतकरी ही ढसाढसा रडले होते.वन विभागावर काहींनी दबाव आणलेला होता. त्यामुळे हे काम बंद पाडले होते. इथल्या शेतकऱ्यांनी उदार मनाने जमिनीमधून कॅनल नेण्यास परवानगी दिल्याने आता माडग्यालकरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. खा. पाटील व माजी आमदार जगताप माझ्या यांच्या माध्यमातून हे स्वप्न पूर्णत्वास येत आहे.

जमदाडे यांचा पाठपुरावा, त्यामुळे या कामास गती

म्हैशाळच्या पाणी पुजनाच्या कार्यक्रमप्रसंगी अनेक वक्त्यांनी जमदाडे यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक केले. अनेक शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले. खा. पाटील यांनी देखील आपल्या भाषणात वारंवार जमदाडे यांचा नामोल्लेख केला. सातत्याने पाठपुरावा केल्याने आज वंचित भागातील काही गावांना परिसरांना पाणी मिळत आहे त्यामुळे आनंदोत्सव होत आहे.असेही म्हटले आहे.

सर्व पक्षाचे नेते एकत्रित आल्याने या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी रंगली होती . माजी आमदार विलासराव जगताप नेहमीप्रमाणे आपल्या सडेतोड बाण्याने बोलत असतात. खा. पाटील यांच्याकडे पाहून म्हणाले काका शेतकऱ्यांचा स्वप्नपूर्ती मेळाव्याबरोबरच राजकीय आमदार खासदार की निवडणुकीसाठी देखील स्वप्नपूर्ती मेळावा आहे .असे दिसून येत आहे. या माझ्यासह सर्व भावी आमदारांना देखील माझ्या शुभेच्छा आहेत. असे म्हणतात या पाणी पूजन स्वप्नपूर्ती मेळाव्यात एकच हास्य पिकले. यावर जगताप यांनी आताचे वातावरण येणाऱ्या विधानसभा लोकसभे निवडणुकीत असेलच असे सांगता येत नाही असे भाष्य देखील केले काका कडे जादू आहे सर्व नेत्यांना एकत्रित करण्याच्या नादात आहेत व तिसऱ्यांदा हॅट्रिक मारण्याच्या नादात आहेत.असे ही जगताप म्हणाले.

Back to top button