जत : वाळेखिंडीत चंदनाचे झाड चोरून नेण्याचा प्रयत्न | पुढारी

जत : वाळेखिंडीत चंदनाचे झाड चोरून नेण्याचा प्रयत्न

जत; पुढारी वृत्तसेवा : वाळेखिंडी (ता.जत) येथील एका शेतकऱ्याच्या बांधावरील चंदनाचे झाड चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र नालवंत काले (वय २२ रा. धायटी ता. सांगोला) असे चंदन चोरून नेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. काले याच्यावर चोरीचा प्रयत्न व चंदनाच्या झाडाचे नुकसान केल्याप्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद शेतकरी दर्याप्पा रामचंद्र गोडसे यांनी जत पोलिसात दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी दर्याप्पा गोडसे यांच्या शेतात चंदनाचे झाड होते. याबाबतची माहिती चोरट्यास लागली होती. शेतात कोणी नसल्याचे पाहून चोरट्याने बांधावरील चंदनाचे झाड तोडले. ही घटना शनिवारी (दि. ९) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली होती. सदरचे झाड तोडल्याने १५ हजारांचे नुकसान झाले आहे. चंदनाच्या झाडाचा महत्वाचा भाग काढून घेण्याचा प्रयत्न असताना चोरटा शेतकऱ्यास सापडला. संबंधित शेतकऱ्यांनी काले या व्यक्तीच्या विरोधात पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

Back to top button