सांगली : डफळापूर येथे कॅनॉलचा भरावा फोडल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल | पुढारी

सांगली : डफळापूर येथे कॅनॉलचा भरावा फोडल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

जत; पुढारी वृत्तसेवा : डफळापुर ( ता.जत) येथे एका शेतकऱ्याने म्हैसाळ उपसा सिंचनच्या कॅनॉलसाठी जमीन भूसंपादित होऊनही वेळेत मोबदला मिळत नसल्याचा राग मनात धरून कालव्याचा भरावा फोडला आहे.यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. याप्रकरणी चिदानंद शिवाना माळी (रा. डफळापूर) या शेतकऱ्यावर महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अभिजीत मधुसदन म्हेत्रे यांनी जत पोलिसात दिली आहे.ही घटना बुधवारी (दि.  सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, म्हैसाळ उपसा सिंचनच्या 2018 साली माळी यांची जमीन भूसंपादित केली आहे. परंतु या जमिनीचा मोबदला अद्याप मिळाला नाही याचा राग मनात धरून बुधवारी चिदानंद माळी यांनी कालव्याचा भरावा फोडला आहे. सदरचा भरावा फोडल्याने कालव्यातील मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे तसेच कालवा दुरुस्त करून पूर्ववत करून न दिल्याने सिंचनात विस्कळीतपणा आला आहे. पाटबंधारे विभागाने माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

Back to top button