राजू शेट्टी यांची कारखानदारांशी सेटलमेंट : सदाभाऊ खोत यांचा आरोप

राजू शेट्टी यांची कारखानदारांशी सेटलमेंट : सदाभाऊ खोत यांचा आरोप

इस्लामपूर: पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांना उसाची पहिली उचल ३३०० रुपये मिळाली असती. मात्र, शेतकरी नेत्याने कारखानदारांशी सेटलमेंट केली. ऊसदरात ५०,१०० रुपयांवर तडजोड करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे मोठे पाप केले आहे. काल (गुरुवारी) आंदोलन करून स्वतःच्याच अंगावर गुलाल उधळून घेतला आहे, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली. कारखानदार व राजू शेट्टी यांचा कट उधळून लावू असा इशाराही त्यांनी दिला. ते रेठरेधरण (ता. वाळवा) येथे बोलत होते.

खोत म्हणाले की, गुरुवारी शेतकरी नेत्यांने आंदोलन केले. त्यांनी स्वतःच्या अंगावर गुलाल उधळून घेतला. ते सांगत आहेत की, शेतकऱ्यांना ५० ते १०० जादा मिळवून दिले. कारखानदारांनी पाठवलेला प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर हे पैसे मिळणार आहेत.
ते म्हणाले, कमी पाऊस व उसाचे क्षेत्र घेटल्याने साखरेचे भाव वाढणार आहेत. यावर्षी प्रतिटन ३३०० रुपये पर्यंत पहिली उचल मिळाली असती. शेट्टी यांनी कारखानदारांशी सेटलमेंट करून शेतकऱ्यांना चांगल्या दरापासून वंचित ठेवले आहे. त्यांनी व कारखानदारांनी शेतकऱ्यांविरोधात कट करून मोठे पाप केले आहे. पहिला हप्ता ३१००, ३२०० मिळाल्यानंतर दुसऱ्या हप्त्यासाठी रस्तावर उतरू. त्या शेतकरी नेत्याचा व कारखानदारांचा कट उधळून लावू, असा इशारा खोत यांनी यावेळी दिला.

logo
Pudhari News
pudhari.news