सांगली : मुख्यमंत्री शिंदेंच्या कथित आदेशानंतरही कृष्णा कोरडीच ! | पुढारी

सांगली : मुख्यमंत्री शिंदेंच्या कथित आदेशानंतरही कृष्णा कोरडीच !

विटा, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री शिंदेंच्या कथित आदेशानंतरही कृष्णेत कोयनेचे पाणी न आल्याने आज गुरुवारीही नदी पात्र बहुतेक ठिकाणी कोरडेच राहिले. कृष्णा नदीतून पाणी उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने गेल्या काही दिवसापासून सांगली जिल्ह्यातील नदीचे पात्र बहुतेक ठिकाणी कोरडे पडले आहे. त्यामुळे नदीकाठासह अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाच्या पाण्या चा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे कोयना धर णातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी सतत होत होती. जिल्ह्यातील खासदार,आमदार यांचाही पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा सुरु होता. मात्र, पाणी सोडले जात नव्हते.

याप्रकरणी काल बुधवारी सायंकाळी सांगली जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी विट्यत पत्रकारांना बोलावून कोयना धरणातून कृष्णा नदीत दरमहा पाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे तसेच तात्काळ उद्या गुरुवार पासून हे पाणी नदी पात्रात सोडले जाईल, तसे आश्वासन खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे सांगितले होते. तसेच या विषयावर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशीही आपले बोलणे झाले आहे, असे म्हंटले होते. त्यानंतर कृष्णा नदीकाठच्या लोकांनी आज गुरूवारी कोयनेच्या पाण्याची चातका सारखी वाट पाहिली. परंतु ,कृष्णा आजही कोरडीच राहिली आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्या विरोधा मुळेच कोयना धरणातून पाणी सोडण्या त येत नाही. तसेच ज्या जिल्ह्यातून स्वत: मुख्य मंत्री एकनाथ शिंदे येतात (मुख्यमंत्री शिंदे यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील दरे हे आहे,तिथे त्यांची शेतीही आहे) त्या सातारा जिल्ह्यात धरण आहे, म्हणून आमदार बाबर यांनी जल संपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे न करता थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली होती.

परंतु मुख्यमंत्र्यांचे संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तसे लेखी अथवा तोंडी आदेश गेले आहेत अथवा नाही याबाबत लोकांतून साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याबाबत आमदार अनिल बाबर यांना विचारले असता, मुख्यमंत्री आज दिवसभर राजस्थानच्या प्रचार दौऱ्यात आहेत. रात्री त्यांच्याशी बोलणे होईल, पाणी सोडायला एखाद-दुसरा दिवस मागेपुढे होऊ शकतो अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button