Manoj Jarange Meeting at Vita : मनोज जरांगे यांच्या सांगली जिल्ह्यातील सभेची तयारी पूर्ण; ७० हजारांहून अधिक लोकांची बैठक व्यवस्था

Maratha reservation-Manoj Jarange patil
Maratha reservation-Manoj Jarange patil

विटा; पुढारी वृत्तसेवा : ५ फूट उंच व्यासपीठ,५ एलईडी स्क्रीन, ७० हजारांहून अधिक लोकांची बैठक व्यवस्था, गाड्या पार्किंगसाठी वेगवेगळी ठिकाणं आणि मोठे ड्रोन अशी मराठा आरक्षण प्रणेते मनोज जरांगे यांच्या विट्यातील सभेची जंगी तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे नेते शंकर मोहिते यांनी दिली आहे.

मराठा आरक्षण प्रणेते मनोज जरांगे-पाटील हे आपल्या तिसऱ्या टप्प्यात पुन्हा महाराष्ट्राचा दौरा सुरू करत आहेत. या दौऱ्याला १५ नोव्हें बरपासून सुरुवात होत आहे. येत्या शुक्रवार १७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजता विट्यातील श्री चौंडेश्वरी मंदिर चौकात सांगली जिल्ह्यातील पहिली सभा होत आहे. ही सभा यशस्वी होण्यासाठी सकल मराठा समा जाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत माहिती देताना शंकर मोहिते म्हणाले, खानापूर तालुक्यातील सर्व गावात आणि वाड्यावस्त्यांवर पत्रके वाटली गेली आहेत. शिवाय पोष्टर्स लावलेल्या रिक्षा आणि डीजे लावलेली वाहने शिवाय व्हाट्स अप,फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात या सभेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. शेजारच्या कडेगाव आणि आटपाडी तालुक्या तील मराठा समाजाच्या नेते आणि कार्यकर्त्यां कडूनही विट्यातील सभा उच्चांकी पार पाडण्या साठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच विटा शहरा मध्ये ज्या दिवशी सभा आहे, त्या दिवशी म्हण जे शुक्रवारी १७ नोव्हेंबर रोजी संपूर्ण व्यापार पेठ बंद ठेवण्यात येणार आहे. जरांगे पाटील यांची ही जिल्ह्यातील पहिलीच सभा असल्याने ती विक्रमी सभा होईल, असा संयोजकांचा विश्वास आहे. आज सकल मराठा क्रांति मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सभा स्थळाची पाहणी करून नियोजनाची आखणी केली.

यावेळी सभेसाठी येणाऱ्या चार चाकी आणि दोन चाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था ही करण्यात आली असून यामध्ये खानापूर रस्त्या कडून येणाऱ्या वाहनांसाठी पालखी मैदानावर पार्किंगची व्यवस्था केली आहे. लेंगरे आणि साळशिंगे रस्त्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी महात्मा गांधी विद्यालयाशेजारील मैदानात पार्किंग असेल. मायणी रस्त्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी आदर्श महाविद्यालयासमोरील जागेत पार्किंग व्यवस्था ठेवली आहे. कराड आणि नेवरी रस्त्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी क्रांतीसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ तसेच विटा हायस्कूलच्या समोरील मैदानात पार्किंग ची व्यवस्था केली आहे. पलूस आणि तासगाव कडून येणाऱ्या वाहनांची व्यवस्था शंभर फुटी रस्त्याकडेला पार्किंग व्यवस्था ठेवण्यात आली आहे. प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी पाच फूट उंचीचे व्यासपीठ तसेच आठ फुटीचा रॅम्प, १५ फुटांचा डी- झोन ठेवण्यात आला आहे. शिवाय सभे च्या ठिकाणी पाच ठिकाणी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी 70 हजाराहून अधिक लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येणारी गर्दी लक्षात घेऊ न पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात आली आहे. शिवाय संपूर्ण सभेच्या परिसरावर नियंत्र ण ठेवण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठे अत्या धुनिक कॅमेरे असलेले फिरते ड्रोन ठेवण्यात आले आहेत असेही मोहिते यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news