सांगली : सोलापूर जिल्ह्यातील दरोडेखोरांच्या टोळीकडून चार गुन्ह्यांची कबूली | पुढारी

सांगली : सोलापूर जिल्ह्यातील दरोडेखोरांच्या टोळीकडून चार गुन्ह्यांची कबूली

विटा; पुढारी वृत्तसेवा : नऊ दिवसांपूर्वी पकडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील दरोडेखोरांच्या टोळीकडून चार गुन्ह्यांची कबूली मिळाली असल्याची माहिती विटाचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे.

ते म्हणाले, गेल्या नऊ दिवसांपूर्वी १८ सप्टेंबर रोजी खानापूर तालुक्यात दरोडा टाकण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील कुख्यात दरोडेखोरांची टोळी विटा पोलिसांनी पकडली होती. विटा ते भिवघाट मार्गावर रेणावी घाटात ही कारवाई केली होती. यांत जितेंद्र भानुदास काळे (वय ३०), सुखदेव शिवाजी काळे (वय ३२), किरण शिवाजी काळे (वय२९), बालाजी माणिक पवार (वय२६,रा. सर्व मार्डी, ता. उत्तर सोलापूर),दादाराव लक्ष्मण पवार (वय ४२रा. राणमासळे ता उत्तर सोलापूर) आणि शिवाजी रामा काळे (वय२६ मूळ राहणार आणि ता जत, जि. सांगली, सध्या रा. मार्डी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे एक लोखंडी कटवणी, एक मोठी पक्कड, एक लाकडी मूठ असलेला कोयता, एक लाकडी दांडके, नायलॉन दोरी, चाकू,स्क्रू ड्रायव्हर आणि मिरची पुड असे साहित्य आणि रोख ९ हजार ६०० रुपये, चार मोबाईल फोन आणि गुन्ह्यासाठी वापरलेली साडेपाच लाख रुपयांची गाडी असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जितेंद्र काळे, सुखदेव काळे, किरण काळे, बालाजी पवार, दादाराव पवार आणि शिवाजी काळे हे सहाही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ते दरोडेखोर आहेत. त्यांच्यावर यापुर्वी अनेक चोऱ्या, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांना २१ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रिमांड दिलेला होता.

यामध्ये अधिक तपासामध्ये विट्यातील २८ ऑगस्ट च्या पहाटे झालेली आमदार अनिलराव बाबर यांचे व्याही पोपटराव विठोबा जाधव, (रा. सिध्दी विनायक ‘कॉलनी साळशिंगे रोड) यांची घरफोडी,२७ ते ३१ मे दरम्यान शंकर देवाप्पा आदाटे, (रा. सावरकर नगर एस.टी. स्टॅण्ड) यांची झालेली घरफोडी, १४ जून रोजी झालेली नितीन महादेव पवार (रा. लकडे पेट्रोल पंपामागे मायणी रस्ता) यांची घरफोडी, तसेच रेवणगाव येथील २० ते ३० जुलै दरम्यान झाले ली सुमन माणिकराव मुळीक यांच्या घरी झाले ला दरोडा उघडकीस आलेला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनी फिर्याद दिली होती. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केली असेही पोलीस निरीक्षक डोके यांनी सांगितले.

Back to top button