सांगली : जत बस स्थानकावर प्रवासी महिलेच्या दागिन्यावर डल्ला; ७० हजाराचा मुद्देमाल लंपास | पुढारी

सांगली : जत बस स्थानकावर प्रवासी महिलेच्या दागिन्यावर डल्ला; ७० हजाराचा मुद्देमाल लंपास

जत; पुढारी वृत्तसेवा : जत येथील एसटी बसस्थानकात जतहून विजापूरला जाणाऱ्या महिलेचे दागिने चोरी केल्याची घटना घडली. ७० हजार किंमतीचे दागिने असल्याची माहिती महिलेने दिली आहे. ही घटना सोमवारी (दि.११) रोजी भरदिवसा घडली आहे. या घटनेने महिला प्रवाशांचा सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबतची फिर्याद धानम्मा भोजपा कोटनाळ (मलया मंदिर, जोरापुर ,विजापूर, कर्नाटक) या महिलेने जत पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कोटनाळ या महिला प्रवाशी जतमध्ये काही कामानिमित्त आल्या होत्या. दरम्यान ,सोमवारी (दि.११ सप्टेंबर) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोटनाळ या जत – विजयपुर या बसध्ये चढत होत्या. दोन अज्ञात दोन चोरट्याने गळ्यातील चेनला हिसडा मारून सोन्याची चैन चोरीस नेली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे संबंधित महिलेला काहीच समजले नाही.त्या गोंधळून गेल्या. शोधाशोध केल्यानंतर चोरटे पळून गेलेले होते. दरम्यान बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी प्रवाशातून होत आहे .या घटनेवरून जत पोलिसांचे चोरट्यावर कोणतेही प्रकारचा वचक राहिला नाही. दरवर्षी अशा घटना घडत आहेत. जत बस स्थानक परिसरात पोलिसांची करडी नजर असण्याची गरज आहे. परंतु पोलीसांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.

Back to top button