सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आण्णा साहेब डांगे भाजपच्या वाटेवर | पुढारी

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आण्णा साहेब डांगे भाजपच्या वाटेवर

शिराळा; पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आण्णासाहेब डांगे यांनी शिराळा येथे एका सत्कार कार्यक्रमात सम्राट महाडिक यांची ओळख करून देताना शिराळा विधानसभा मतदार संघातील भावी आमदार अशी ओळख करून दिली. या वक्तव्यामुळे आण्णा साहेब डांगे भाजपच्या वाटेवर जाणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

शिराळा विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार सम्राट महाडीक असून ते निश्चित आमदार होणार म्हणजे होणारच, असे माजी मंत्री आण्णा साहेबडांगे यांचे हे वक्तव्य शिराळ्यात पुरस्कार सोहळा कार्यक्रमात वाळवा-शिराळ्यातील माजी मंत्री, शिवाजीराव नाईक, माजी मंत्री सदाभाऊ खोत, यांच्या उपस्थितीत केले.

कार्यक्रमा दरम्यान अनेक मान्यवरांची भाषणे झाली. पुरस्कार सोहळ्याचे वितरण झाले. शेवटी आण्णासाहेब डांगे हे अध्यक्षीय भाषण करण्यास उठले. भाषणाच्या सुरूवातीला मान्यवरांची ओळख करून देतानाच सम्राट महाडीक यांचे नावे घेताना,शिराळ्याचे भावी आमदार असा केला. व ते आमदार होणार म्हणजे होणारच असे म्हणताच सम्राट महाडीक यांनी आण्णांना नमस्कार करत आभार व्यक्त केले.

काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापूर येथे सभा झाली होती. या सभेला ही आण्णासाहेब डांगे यांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. आणि रविवारी झालेल्या कार्यक्रमातील सम्राट महाडीक यांच्यावरील या वक्तव्यामुळे पुन्हा दोन्ही तालुक्यात चर्चा रंगली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत सम्राट महाडीक यांनी ५० हजार मतांचा आकडा गाठला होता.

आणासाहेब डांगे सारखे दिग्गज नेते यांनी सम्राट महाडिक यांना पाठिंबा दिला तर सम्राट महाडिक यांची ताकत नक्की वाढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये त्यांची घुसमट होत आहे हे स्पष्ट दिसू लागले आहे. आमदार जयंत पाटील व आमदार मानसिंगराव नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. परंतु आण्णा साहेब डांगे हे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहतील असे दिसत नाही.

Back to top button