शिराळा; पुढारी वृत्तसेवा : शिराळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यातील संशयीत आरोपी अजिंक्य शिवाजी पाटील (वय 24) या तरुणावर पोक्सो कायद्याअंतर्गत व अॅट्रॉसिटी अंतर्गत शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, संशयीत अजिंक्य शिवाजी पाटील याने अल्पवयीन मुलीस 4 सप्टेंबरच्या रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान घरातून फूस लावून पळवून नेले. त्यानंतर कोल्हापूर येथे 4 सप्टेंबर रोजी तिच्या बलात्कार केला. या प्रकरणी संशयीत आरोपी अजिंक्य पाटील यास पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. शिराळा पोलीसात मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण हे करीत आहेत.