सांगली : आटपाडीत पाळत ठेवून वृध्दाचे दोन लाख लंपास | पुढारी

सांगली : आटपाडीत पाळत ठेवून वृध्दाचे दोन लाख लंपास

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : आटपाडी येथील तुकाराम सदाशिव देशमुख (वय-७८ रा.विठठलनगर,आटपाडी) यांचे दोन लाख रूपये गुरवारी (दि.२४) चोरीस गेले. आज दुपारी १२ च्या दरम्यान बाजार समिती ते श्रीराम कॉलेज रस्त्यावर इंडेन गॅस एजन्सीचे समोर ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, तुकाराम देशमुख यांनी आज सकाळी ११.३० वाजता बँक ऑफ इंडिया आटपाडी शाखेतील खात्यावरुन दोन लाख रुपये काढले. त्यानंतर बाजारपेठेतील औषध दुकानातून त्यांनी कायमचूर्ण औषध घेतले. पैसे,औषध आणि पासबुक एका कापडी पिशवीत ठेऊन ही पिशवी त्यांनी सायकलचे पुढील कॅरीयर मध्ये ठेवली. मुलीला आणि मुलीला बांधकामासाठी हे पैसे देण्यासाठी श्रीराम कॉलेज ते बाजार समिती रस्त्यावरून चालले होते.

इंडेन गॅस एजन्सी समोर सायकलचे मागील चाकात अडकलेली सुतळी काढण्यासाठी ते खाली बसले. या कालावधीत सायकल कॅरीयर मध्ये ठेवलेली पैशांची पिशवी ही अज्ञात चोरटयाने लंपास केली. बँक ऑफ इंडिया शाखेत जाऊन पोलीसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले. बँकेतील सीसीटिव्ही सुरू होता.पण बँकेच्या बाहेरील सीसीटिव्ही बंद असल्याने काही समजू शकले नाही. देशमुख यांनी बँकेत साठवलेले पैसे मुलीला आणि मुलाला देऊन त्यांना सुखद धक्का द्यायचा होता.परंतु पाळत ठेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या पुंजीवर डल्ला मारला. या घटनेमुळे ते खूप निराश झाले होते.

हेही वाचलंत का?

Back to top button