सांगली जिल्ह्यातील गलाई व्यवसायिकाचा दिल्लीत खून! | पुढारी

सांगली जिल्ह्यातील गलाई व्यवसायिकाचा दिल्लीत खून!

विटा; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील घोटी बुद्रुक (ता. खानापूर) येथील तरुण गलाई व्यवसायिकाचा खून झाल्याच्या घटनेने तालुकाभरात खळबळ माजली आहे. प्रताप महादेव जाधव असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. प्रकरणी दिल्ली पोलिसात तिघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील घोटी बुद्रुक येथील गलाई व्याव सायिक प्रताप जाधव यांचे दिल्लीतील करोल बाग येथे सोने चांदी गाळण्याचे (गलाईचे) दुकान आहे. काल बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास संबंधित दुकानातच धारदार शस्त्राने प्रताप जाधव यांचा खून करण्यात आला आहे. याबाबत शेजारच्या लोकांनी दिल्ली पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तात्काळ दिल्ली पोलीस घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी जाधव यांच्या दुकाना तील तीन कामगारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रताप जाधव हे खानापूर तालुक्या तील घोटी बुद्रुक येथील मूळचे रहिवासी असून त्यांच्या शिक्षण इयत्ता दहावी पर्यंत झाले आहे. त्यानंतर त्यांनी गलाई व्यवसायात भाग घेतला. त्यानंतर हळूहळू त्यांनी गेल्या पंधरा वर्षापासून स्वतःचे दुकान दिल्लीतील करोल बाग येथे उभारले. तिथे त्यांचे कुटुंब असून घरात पत्नी आणि दोन मुले असतात. काल बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान प्रताप जाधव यांचा खून करण्यात आला आहे. हा खून त्यांच्याच दुकाना तील कामगारांनी केल्याची शक्यता घरातले लोक आणि नातेवाईकांनी पोलिसकडे व्यक्त केली आहे. त्यांच्या दुकानात एकूण तीन कामगार आहेत त्यापैकी दोघेजण घोटी बुद्रुक येथील असून एक जण कर्नाटक राज्यातील आहे. या तिघांविरोधात दिल्ली करोल बाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button