File Photo
File Photo

अलमट्टीतून १ लाख क्युसेक्स विसर्ग वाढवण्याच्या सूचना द्या : कृष्णा महापूर नियंत्रण समितीची सीएम शिंदेकडे मागणी | Almatti Dam Water Discharge

विटा; पुढारी वृत्तसेवा : सांगली कोल्हापूरातील पूरस्थिती लक्षात घेता अलमट्टी धरणातून तात्काळ १ लक्ष क्युसेक्स विसर्ग वाढवण्यासाठी कर्नाटक प्रशासनाला तात्काळ सूचना द्याव्यात अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने (Krishna Flood Control Committee) मुख्य मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. (Almatti Dam Water Discharge)

कृष्णा नदीची पाणी पातळी पाहता २०१९ ची महापुराची परिस्थिती टाळण्यासाठी आपण तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबा बत या समितीने आज मुख्यमंत्री कार्यालयाकडे ई मेल पाठविला आहे. (Almatti Dam Water Discharge)

यांत म्हंटले आहे की, आज सोमवार २४ जुलै रोजी कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणी पातळी ५१४.९४ मीटर आहे (Almatti Dam Water Level) . तर धरणातील पाण्याचा येवा म्हणजे आवक १लाख १४ हजार ४४५ क्यूसेक्स इतका आहे तर धरणातून केवळ ६२.५३ क्यूसेक्स पाणी पुढे सोडले जात आहे. त्याच वेळी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात अलमट्टी धरणाच्या पाण लोटात आणि इतर मुक्त पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पंचगंगा नदी काठावरील जनता भयभीत झाली आहे.

आज रोजी सांगली येथे कृष्णा नदीची पाणी पातळी ५३३.९० मीटर, १३.९" फूट तसेच कोल्हापूरच्या पंचगंगेची पाणीपातळी ५४१.९५ मीटर, ३८.७ इतकी आहे. यात कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचा इशारा पाणी पातळी ५४२.२६ मीटर, ३९.०० फूट वाढून ती धोका पातळी ५४३.३० मीटर म्हणजे ४३ फुटांवर जाण्याची दाट शक्यता आहे.

वास्तविक केंद्रीय जल आयोगाचे नोव्हेंबर २०१८ ची मार्गदर्शक पुस्तिका अलमट्टी धरण देखभाल आणि परिचलन अन्वये ३१ जुलै अखेर अलमट्टी धरणातून ५१३.६० मीटर पाणी पातळी ठेऊन, वरून येणारा विसर्ग तसाच सोडला तर पंचगंगा नदी पात्रातील पाणी पातळी कमी होईल व नागरिकांचे भय कमी होईल. म्हणून अलमट्टी धरणातून तात्काळ १ लक्ष क्युसेक्स विसर्ग वाढवण्यासाठी कर्नाटक प्रशासनाला आपल्या मार्फत तात्काळ सूचना देण्यात याव्यात अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीचे संघटक जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता विजय कुमार दिवाण, प्रभाकर केंगार आणि निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news