

कुपवाड : पुढारी वृत्तसेवा, पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन टारझन हा आज (सोमवार) पहाटे पुण्याहून अहिल्यानगर मधील एका महिलेच्या घरात आला होता. ही माहिती मिळताच संशयित तरुणाने घरात घुसून टारझन याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वर्मी घाव घातले. यावेळी सच्या टारझन हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून येताच संशयित हल्लेखोर तेथून पसार झाला. (Sangli Crime)
जखमी टारझन याला काही नागरिकांनी जखमी अवस्थेत सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने संशयितास ताब्यात घेतले आहे. (Sangli Crime)