सांगली : ऐतवडे बुद्रुक येथे शेतकऱ्याच्या विहिरीत पडला बिबट्या

सांगली : ऐतवडे बुद्रुक येथे शेतकऱ्याच्या विहिरीत पडला बिबट्या

ऐतवडे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील आप्पासो नेमगोंडा पाटील – शिरोटे यांच्या विहिरीत गुरुवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडला. शुक्रवारी (दि.९) रोजी सकाळी पाटील हे विहिरीवर मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना ही बाब निर्दशनास आली. संबंधित शेतकऱ्याने वनविभागाला याबाबतची माहिती दिली आहे.

माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पिंजऱ्यासह दाखल झाले आहेत. यामध्ये रेंजर भगले, भगवान गायकवाड, निवास ऊगळे, अनिल पाटील, भिवा कोळेकर, अश्विनी वाघमारे यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कुरळप पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

दरम्यान येथे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुपारीपर्यत क्रेनच्या साहाय्याने पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news