Sangli News : दोन हजारांच्या बनावट नोटा प्रकरणी दोघांना अटक | पुढारी

Sangli News : दोन हजारांच्या बनावट नोटा प्रकरणी दोघांना अटक

शिराळा; पुढारी वृत्तसेवा : शिराळा शहरात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणी एकूण चार आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यामध्ये सविता सुरेश लोकरे व आदीत्य‌‌‌ प्रतापसिंह परदेशी यांना शिराळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून संशयित मंदार मोहन उबाळे व गौरव राजू पारेख (दोघेही रा.शिराळा) हे दोघे अद्याप फरारी आहेत. शिराळा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी सविता सुरेश लोकरे (रा. पाडळेवाडी), आदित्य प्रतापसिंह परदेशी (रा.शिराळा ) या दोघांना शिराळा पोलिसांनी अगोदरच अटक केली आहे सध्या ते दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. संशयित आरोपी मंदार उबाळे व गौरव पारेख हे दोघे अद्याप फरारी आहेत.

गुरुवार (दि. २५ मे) रोजी दुपारी अडीच वाजता सविता सुरेश लोकरे (रा.पाडळेवाडी) यांनी बँकेमध्ये 50 हजार रुपयांचा भरणा केला त्यामध्ये दोन हजार रुपयांच्या तेरा नोटा रक्कम 26 हजार होती. या तेरा नोटा बँकेने तपासल्या असता बनावट असल्याचे आढळून आले या बनावट नोटा बँकेत भरताना आदित्य परदेशी हा सोबत होता तर त्यास मंदार उबाळे याने या नोटा बँकेत भरण्यासाठी दिल्या. पुढील तपासात गौरव राजू पारेख यांचे नाव निष्पन्न झाले आहे.

बनावट चलनी नोटा प्रकरणी शिराळा तालुक्यात खळबळ माजली असुन या प्रकरणाची पाळेमुळे सांगली व कोल्हापूर जिल्हा येथे खोलवर गेल्याची चर्चा आहे. या बाबतची फिर्याद आय सी.आय सी.आय बँकेचे कर्मचारी मचिंद्रनाथ पवार यांनी दिली होती.

Back to top button