सांगली : भाजपचा संचालक फोडून सेनेचा सभापती

सांगली : भाजपचा संचालक फोडून सेनेचा सभापती
Published on
Updated on

आटपाडी : पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी निवडणुकीत सभापती पदावर शिवसेना शिंदे गटाचे संतोष पुजारी आणि उपसभापती पदावर काँग्रेसचे राहुल गायकवाड यांची दहा विरुद्ध आठ मताच्या फरकाने निवड झाली. शिवसेना, काँग्रेस आणि रासप शिवसेना आघाडीने भाजपला धोबीपछाड दिली. बाजार समितीत नाट्यपूर्ण घडामोडीनंतर सत्तांतर झाले आणि पहिल्यांदाच भगवा फडकला. पुजारी यांच्या रुपाने धनगर समाजाला प्रथमच सभापतीपदाचा बहुमान प्राप्त झाला.

आटपाडी बाजार समिती निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे हणमंतराव देशमुख या आघाडी विरोधात शिवसेना शिंदे गटाचे तानाजीराव पाटील, काँग्रेस, रासप आघाडीत अटीतटीची लढत झाली. भाजप आघाडी आणि शिवसेना आघाडीला प्रत्येकी 9 जागा मिळाल्या. भाजप आघाडीमार्फत राष्ट्रवादीच्या हणमंतराव देशमुख यांनी सभापती पदासाठी तर उपसभापती पदासाठी दादासाहेब हुबाले यांचे अर्ज भरले. शिवसेनेने सभापती पदासाठी संतोष पुजारी तर उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या राहुल गायकवाड यांचे अर्ज भरले. दोन वाजता गुप्त मतदान घेण्यात आले. दोन्ही आघाड्यांचे समान संचालक असल्याने सामना बरोबरीत सुटेल आणि चिठ्ठीवर निवडी होतील, अशी अपेक्षा होती. परंतु तानाजीराव पाटील यांच्या धूर्त खेळीने भाजपचे एक मत फुटले आणि सेनेचा सभापती तर काँग्रेसचा उपसभापती झाला.

…बाजार समिती ये तो झांकी है

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आणि बाजार समिती निवडणूक ये तो झांकी है पिक्चर अभी बाकी है.. नूतन पदाधिकारी बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाला चालना देतील, अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेचे संचालक व शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news