सांगली : मिरजेत मालगाडी घसरली! रुळाला बेंड आल्याने घडली घटना; प्रवासी रेल्वे वाहतूक सुरळीत

सांगली : मिरजेत मालगाडी घसरली! रुळाला बेंड आल्याने घडली घटना; प्रवासी रेल्वे वाहतूक सुरळीत
Published on
Updated on

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरज रेल्वे स्थानकाच्या आउट पॉईंट जवळ मालगाडीच्या इंजिनसह दोन डबे रुळावरून घसरले. युरिया घेऊन सातारा कडे जात असताना मालगाडीची ही दुर्घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, दुर्घटनाग्रस्त मालगाडी दक्षिणेतून युरिया घेऊन मिरजेत आली होती. या मालगाडीला जोडण्यात आलेल्या 42 डब्यामध्ये युरिया भरण्यात आला होता. यापैकी 21 डबे मिरज यार्डमध्ये सोडण्यात आले. त्यानंतर ही मालगाडी 21 डबे घेऊन साताराकडे निघाली होती. मालगाडी रेल्वे स्थानकातून आउट पॉईंट जवळ आल्यानंतर दोन इंजिन पैकी एक इंजिन आणि 21 डब्यांपैकी दोन डबे रुळावरून घसरले. रुळाला बेंड आल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मिरज- पुणे रेल्वे मार्गावर ही घटना घडली असली तरी रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news