Sangli-Kolhapur highway : सांगली-कोल्हापूर महामार्ग ४ तास ठप्प; उदगाव पुलाजवळ झाडे पडल्याने वाहनांच्या रांगा | पुढारी

Sangli-Kolhapur highway : सांगली-कोल्हापूर महामार्ग ४ तास ठप्प; उदगाव पुलाजवळ झाडे पडल्याने वाहनांच्या रांगा

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : उदगाव (ता.शिरोळ) ते अंकली (ता.मिरज) दरम्यान कृष्णा नदीच्या अंकलीकडील बाजूस असलेल्या मोठ्या पुलाजवळ वादळी वाऱ्याने ६ झाडे पडल्याने सांगली- कोल्हापूर महामार्ग तब्बल ४ तास ठप्प होता. त्यामुळे वाहनधारकाचे प्रचंड हाल झाले. तर या वाहतूक ठप्पमध्ये १०० हुन अधिक एस टी बसेस व एक रुग्णवाहिका अडकून पडली होती. अखेर जयसिंगपूर पोलिसांच्या प्रयत्नानंतर झाडे बाजूला काढून सायंकाळी साडे सहाच्या सुमारास वाहतूक खुली झाली. (Sangli-Kolhapur highway)

याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी दुपारी आडीचच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली. यात उदगाव (ता.शिरोळ) ते अंकली (ता.मिरज) दरम्यान कृष्णा नदीच्या अंकलीकडील बाजूस असलेल्या मोठया पुलाजवळ वादळी वाऱ्याने भली मोठी ६ झाडे पडल्याने सांगली- कोल्हापूर महामार्ग ठप्प झाला. त्यानंतर उदगाव ते जयसिंगपूर मार्गावर तब्बल ६ किलोमीटर तर सांगलीकडील बाजूला ५ किलोमीटर तर मिरज कडील बाजूस ४ किलोमीटर तसेच उदगाव ते तमदलगे बायपास मार्गावर तब्बल जैनापूर पर्यत वाहतूक ठप्प झाली. (Sangli-Kolhapur highway)

घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पो.कॉ.सचिन चौगुले, कांशीराम कांबळे, वैभव सूर्यवंशी, गुलाब सनदी, विजय मगदूम, विशाल खाडे यांच्या इतर दाखल होऊन तात्काळ पडलेली झाडे बाजूला करण्यात आली. त्यानंतर पाचच्या सुमारास जयसिंगपूर पोलिसानी वाहतूक सोडण्यास सुरुवात केल्यानंतर तब्बल दोन तास वाहतूक कोंडी निघाली नव्हती. त्यामुळे मिरजकडे जाणाऱ्या वाहने उदगाव-चिंचवाड-अर्जुनवाड मार्गे सोडण्यात आली.

या वाहतूक कोंडीमुळे कामावरून घरी जणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. तर यात मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, विजापूर यासह इतर १०० हून अधिक एस टी बसेस अडकून पडल्या होत्या. शिवाय रुग्ण नेणारी रुग्णवाहिक अडकून पडल्याने पोलिसांनी अनेक प्रयत्न करून रुग्णवाहिका रवाना केली.

Back to top button