सांगली: भाग्यनगरात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ | पुढारी

सांगली: भाग्यनगरात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

विटा : पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यातील भाग्यनगर येथे आज (दि.१७) तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. विजय बाळासो निकम (वय ३२, रा. नागेवाडी, ता. खानापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारपासून तो घरातून निघून गेला होता. दरम्यान, मृतदेहाच्या डोक्यावर जखमेच्या खुणा आणि शेजारी विषारी औषधाची बाटली आढळल्याने संशय वाढला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, नागेवाडी येथील विजय निकम हा शुक्रवार (दि. १४) घरातून निघून गेला होता. आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास भाग्यनगर येथील वडजाई मळ्यात बबन काटकर यांच्या शेतात विजयचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. शेजारच्या लोकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिस पथकाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
या प्रकरणी भाग्यनगर येथील माणिक सुबराव जगताप यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मृत विजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. पुढील तपास विटा पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button